भंडा-यात दलित मुलीवर केला सामूहिक बलात्कार

February 13, 2009 3:34 PM0 commentsViews: 7

13 फेब्रुवारी , भंडारादीपेन्द्र गोस्वामीभंडारा जिल्ह्यातल्या पिंपळगाव येते एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. ती पीडित मुलगी दलित समाजातली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीना अटक केलीय. सतरा वर्षाच्या या मुलीवर चार फेब्रुवारी रोजी तीन तरुणांनी बलात्कार केला.तिला गावाबाहेरील तळ्याजवळच्या एकांत स्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.या प्रकारामुळे या मुलीवर मानसिक आघात झालाय. हे प्रकरणं दडपलं जाण्याची शक्यता इथल्या दलित कार्यकर्त्यांना वाटतेय. भंडारा जिल्ह्यातली शेकडो दलित कार्यकर्ते पिंपळगाव इथे जमले होते. या दलित कार्यकर्त्यांना रास्ता रोको केला. तलसंच निषेधार्थ गृहराज्यमंत्री नितीन राऊत, पोलीस अधिक्षक सुरेश सागर आणि आमदार नाना पडोळे यांचे पुतळे जाळले तसंच पोलिस अधिक्षक सुरेश सागर आणि पोलिस निरिक्षक बिबिण यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केलीय.पीडित मुलगी, त्या रात्री काकुला सोडुन परत येत होती. त्यावेळी चौकात उभे असलेली तीन मुलं मला जबरदस्ती घेऊन गेले. आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करणारे तिघे तरुण हे सवर्ण समाजातले आहेत. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरुन लाखणी पोलिसांनी बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय आणि त्या तिघांना अटकही केली. पण हे प्रकरणं दडपलं जाण्याची शक्यता गावातल्या दलित कार्यकर्त्यांना वाटत होती. म्हणून दलित कार्यकर्त्यांनी घुसमट आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केली. भंडारा जिल्ह्यातली शेकडो दलित कार्यकर्ते पिंपळगाव येथे जमले होते. या दलित कार्यकर्त्यांना रास्ता रोको केला. आंदोलकांनी घटनेच्या निषेधार्थ गृहराज्यमंत्री नितीन राऊत, पोलीस अधिक्षक सुरेश सागर आणि आमदार नाना पडोळे यांचे पुतळे जाळले. तर पोलीस अधिक्षक सुरेश सागर आणि पोलीस निरिक्षक बिबीणयांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केलीय." पोलीस निरिक्षक आणि एसपी यांना बडतर्फ करा, " अशी मागणी समाजसेवक परमानंदन मेश्राम यांनी व्यक्त केली. दोन वर्षांपूर्वी याच भंडारा जिल्ह्यात खैरलांजी येथे अमानुष बालत्काराचं हत्याकांड घडलं होतं.याच भंडारा जिल्ह्यात आता पुन्हा एका दलित मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानं पुन्हा एकदा खळबळ माजलीय.

close