राजस्थानमध्ये 70 ते 74 टक्के मतदान

December 1, 2013 6:15 PM0 commentsViews: 331

rajastanvoting1 डिसेंबर : विधानसभेच्या 200 पैकी 199 जागांसाठी राजस्थानमध्ये आज मतदान झाले. सुमारे 74 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे असून टक्केवारी गोळा करण्याचे काम अजूनही चालू आहे. ही निवडणूक काँग्रेससाठी मोठी परीक्षा असल्याचे मानले जाते. राजस्थानमधले 4 कोटींपेक्षा जास्त मतदार अशोक गेहलोत सरकारचे भवितव्य ठरवणार आहेत.

 

या निवडणुकीसाठी 2 हजार 87 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरदारपुरा मतदार संघातून उभे आहेत. तर भाजपच्या वसुंधरा राजे झालरपटण मतदारसंघातून परत सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न करतायेत. या दोघांनीही आज रविवारी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला.चुरूमधल्या मतदार संघातल्या बसप उमेदवाराचं निधन झाल्यामुळे तिथली निवडणूक 13 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

close