दाभोलकरांच्या खुनाचा थोडासा सुगावा लागला- शिंदे

December 1, 2013 7:47 PM0 commentsViews: 551

Image shinde_300x255.jpg1 डिसेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणासंबंधीतल्या तपासात पोलिसांना थोडासा सुगावा लागला असल्याची माहिती खुद्द केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. आज रविवारी मुंबईत पत्रकारांशी त्यांनी बातचीत केली.

 

यावेळी, डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या तपासाविषयीही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तीनच दिवसांपूर्वी डॉ. दाभोलकरांचे कुटुंबीय आपल्याला भेटले. त्यावेळी आपण महाराष्ट्र सरकारशी बोलो. या तपासाला काहीशी दिशा मिळाली आसल्याचे यावेळी शिंदे यांनी म्हटलं.

डॉ. दाभोलकरांच्या खूनाचा थोडासा सुगावा पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलीस या प्रकरणात अधिक प्रयत्न करताहेत अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुंबईत दिली. दाभोलकरांच्या कुटुंबीयांनी आपली भेट घेतली. त्याबद्दल आपण राज्य सरकारशी याबाबत बोल्‌लो. त्यावेळी ही माहिती आपल्याला मिळाल्याचं शिंदे म्हणाले.

 

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी पुणे गुन्हे शाखेनं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. दाभोलकरांच्या खुनामागे कोणत्याही धर्मांध शक्ती नाहीय, असं यात म्हटलंय. त्यामुळे दाभोलकरांच्या खुनाचं गूढ आता आणखी वाढलंय. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाप्रकरणी केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केली होती. खुनाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात यावा अशी मागणी केतन तिरोडकर यांनी याचिकेत केली होती.

 

मात्र, तपास योग्य प्रकारे सुरू आहे, त्यामुळे एनआयएकडे तपास सोपवण्याची गरज नाही, असं पोलिसांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. दाभोलकरांना धमक्या आलेल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं नव्हतं, असंही पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा 20ऑगस्टला पुण्यात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.

close