अलमट्टीचं पाणी पुन्हा पेटण्याची शक्यता !

December 2, 2013 10:27 AM0 commentsViews: 201

ammavti dam2 डिसेंबर :  कर्नाटकमधले अलमट्टी धरणाचे पाणी पुन्हा पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. या धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्याची परवांगी कृष्णा पाणी वाटप लवादाने 2010मध्येच दिली असून महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशाने या प्रस्तावाला विरोध केला होता. धरणाची उंची वाढली तर कोल्हापूर, सांगली जिल्हयात तसंच आंध्रप्रदेशात पुराचा धोका निर्माण होणार असल्याचे सांगत महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशाने याला विरोध केला. पण हा निर्णय योग्य असल्याचे लवादाने रविवारी पुन्हा एकदा स्पष्टं केलं.

 

सध्या या धरणाची उंची 519.6 आहे, तर प्रास्ताव मंजुर झाल्यास धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्यात येईल, म्हणजेच 524.256 मिटर करण्यात येईल. हा प्रस्ताव सोमवारी सुरु होणार्‍या कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. 2010 मध्ये याच आयोगाने अलमट्टी धरणाची उंची 524.256 पर्यंत वाढवण्यासाठी कर्नाटकला परवानगी दिली होती. आयोगाने तोच निर्णय पुन्हा या योग्य ठरवला आहे.

 

पण या धरणाची उंची वाढवली तर आंध्र आणि महाराष्ट्राला पुराचा धोका निर्माण होईल हा आक्षेप लवादाने खोडून काढला आहे. या लवादात न्यायमुर्ती ब्रिजेश कुमार, न्यायमुर्ती डी.के.शेठ, न्यायमुर्ती पी.बी.दास यांच्या सहभाग आहे.दरम्यान, कर्नाटकने हा प्रस्ताव मंजूर केला तर धरणाची उंची वाढवू नये, असा प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभेत मंजूर करू, अशी प्रतिक्रिया राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली आहे.

close