रिऍलिटी शो मागचं विदारक सत्य

February 13, 2009 4:12 PM0 commentsViews: 4

13 फेब्रुवारी, नागपूर प्रशांत कोरटकर रिऍलिटी शोच्या झगमगाटामागचं एक कटू वास्तव नागपूरमध्ये समोर आलंय. बक्षिसाची रक्कम जाहीर झाली, पण दोन वर्षं उलटूनही विजेत्याला ही रक्कम मिळालीच नाही. विजेत्या कलाकाराचं नाव प्रभाकर सुखदेवे नाव आहे. 2005-2006 मध्ये दूरदर्शनच्या डीडी नॅशनल चॅनेलवर ' स्टार कलाकार्स ' या नावाचा रिऍलिटी शो झाला होता. क्लिनिक ऑल क्लिअर कंपनीचा रिऍलिटी शो होता.आणि त्याचे परीक्षक अभिनेते अमोल पालेकर आणि वर्षा उसगावकर हे दोघं होते. या शोसाठी त्याला पंचवीस लाख रुपयांचंं बक्षीस जाहीर झालं होतं. बक्षिस न मिळाल्यामुळे प्रभाकर सुखदेवेला जबर मानसिक धक्का बसला आहे. बक्षिसाऐवजी त्याला मेगा सिरीयल आमिष दाखवलं गेलं.पण तो ही आयोजकांचा खोटारडेपणाच होता. त्यामुळे प्रभाकरचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं आहे. प्रभाकरच्या मुंबईतल्या वास्तव्यासाठी त्याच्या कुटुंबियांनी खूप पैसे खर्च केले होते. पण आता पैसेही नाहीत आणि प्रभाकरचंही आरोग्य धोक्यात आलं आहे. रिऍलिटी शोमागाचं कटू वास्तवर प्रभाकरसारख्या पीडितांमुळे समोर आलंय. याची जबाबदारी दूरदर्शनची डीडी नॅशनल वाहिनी आणि त्यात काम कारणारे परीक्षक घेतील काय, ही शंका उपस्थित होत आहे.

close