तेजपालांची कसून चौकशी, घटनांची पुनर्बांधणी होण्याची शक्यता

December 2, 2013 11:38 AM0 commentsViews: 153

tejpal_leavingcourt12 डिसेंबर : सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचासाप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या दिवशी घडलेल्या सगळ्या घटनांची पुनर्बांधणी करण्यासाठी पोलिस आज तेजपालला ‘हयात’ या पंचतारांकीत हॉटेलमध्ये नेण्याची शक्यता आहे. चौकशीसाठी तेजपालला 6 दिवसांची पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. तरुण तेजपालला शनिवारी अटक करण्यात आल्यानंतर कालची रात्र त्यांची जेलमधली दुसरी रात्र होती.

 

काल पोलिसांनी तेजपालची 5 तास कसून चौकशी केली. त्याशिवाय ज्या तीन सहकार्‍यांकडे पीडित मुलीने आपल्यासोबत घडलेली घटना बोलून दाखवली होती, त्या 3 कर्मचार्‍यांचे जबाबही गोवा पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. या प्रकरणात आता ते साक्षीदार असतील आणि केस मजबूत करण्यासाठी कदाचित त्यांना मॅजिस्ट्रेट समोरही हजर करण्यात येईल.

 

 

close