महानगरपालिकेचं बिग बजेट

December 2, 2013 1:06 PM0 commentsViews: 215

शैलेश तवटे, नवी मुंबई

2 डिसेंबर :  नवी मुंबई महानगर पालिकेने नवी मुंबईच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचे वन टाईम बजेट तयार केले आहे. पण, या बजेटला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे.
सत्ता आणि बहुमताच्या जोरावर काहीही करता येतं याचा एक उत्तम नमुना म्हणजे नवी मुंबई पालिकेचं वन टाईम बजेट. 25 वर्षांसाठीचे 12 हजार 800 कोटी रुपयांचे हे वन टाईम बजेट. जून 2013 मध्ये महासभेत बहुमताच्या जोरावर या बजेटचा ठराव मंजूरही करण्यात आला. नवी मुंबईत सिडकोने विकास केला नाही. त्यामुळेच वन टाईम प्लॅनिंग करण्यात आले, असा दावा महापौर करत आहेत.

याच वन टाईम बजेटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. मात्र याच कायद्याच्या चौकटीत बीएमसी ऍक्टप्रमाणे कलम 86 नुसार महापालिकेच्या निधीतून स्थिर बजेटशिवाय कुठल्याही प्रकारचा खर्च करू शकत नाही, असं म्हटलं. हा ठराव राज्य सरकारकडे गेला असला तरी सध्या या ठरावाला हायकोर्टात आव्हान देण्यात आला.

बजेट राज्यरकारकडून मंजूर होण्याआधीच गणेश नाईकांनी सेक्टर पंधरामध्ये हा पायलट प्रोजेक्ट सुरु केलाय. महापालिकेचं हे बिग बजेट स्वीकारले जातेय की नाकारले हे पहावे लागेल.

नवी मुंबई महापालिकेनं हे बजेट मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवलंय. विकासकामांसाठी वेगवेगळ्या यंत्रणांकडून पैसा उभा करू, असा दावा पालिकेनं केलाय. पण, राज्य सरकारनं हे बजेट अजून मंजूर केलेलं नाही. हे बजेट मंजूर करण्यात का अडचणी येऊ शकतात, ते बघूया.
प्रकल्पासाठी खर्चाची उभारणी
प्रकल्प खर्च                                       (कोटी रु.)         खर्चाची उभारणी

1) सर्व नोड्सचा विकास                     3,733             महानगर पालिकेच्या उत्पन्नातून

2) शहर स्तरावरचा विकास             4,093             -1 हजार कोटी MMRDA
-650 कोटी JNNURMच्या अनुदानातून
-2443 कोटी डेफर्ड पेमेंट

3) प्रादेशिक स्तरावरचा प्रकल्प     4,995.5           राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था आणि बँकांकडून कर्ज

     एकूण खर्च      –                           12821.5

close