तेजपालची ‘पुरूषार्थ’ चाचणी

December 2, 2013 3:06 PM0 commentsViews: 255

BL21_TEJPAL_1660183f 2 डिसेंबर :सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपवरुन पोलीस कोठडीत असलेल्या तरुण तेजपालची गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पोटेन्सी टेस्ट म्हणजेच ‘पुरूषार्थ’ चाचणी करण्यात आली. त्यानंतर आता तरुण तेजपालची रवानगी दोना पावला पोलिस स्टेशनला करण्यात आली असून तिथे तेजपालची चौकशी करण्यात येणार आहे.

 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या दिवशी घडलेल्या सगळ्या घटनांची पुनर्बांधणी करण्यासाठी पोलिस आज (सोमवार) तेजपालला ‘हयात’ या पंचतारांकीत हॉटेलमध्ये नेण्याची शक्यता आहे. चौकशीसाठी तेजपालला 6 दिवसांची पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. तरुण तेजपालला शनिवारी अटक करण्यात आल्यानंतर कालची रात्र त्यांची जेलमधली दुसरी रात्र होती.

 

रविवारी पोलिसांनी तेजपालची 5 तास कसून चौकशी केली. त्याशिवाय ज्या तीन सहकार्‍यांकडे पीडित मुलीने आपल्यासोबत घडलेली घटना बोलून दाखवली होती, त्या 3 कर्मचार्‍यांचे जबाबही गोवा पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. या प्रकरणात आता ते साक्षीदार असतील आणि केस मजबूत करण्यासाठी कदाचित त्यांना मॅजिस्ट्रेट समोरही हजर करण्यात येईल.

 

close