मोहन रावलेंची शिवसेनेतून हकालपट्टी

December 2, 2013 3:37 PM1 commentViews: 2717

udhav on ravale02 डिसेंबर  : शिवसेना हा दलालांचा पक्ष आहे अशी जळजळीत टीका करणारे शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार मोहन रावले यांनी तडाकफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. मोहन रावले यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर कडाडून टीका केली. ही पत्रकार परिषद संपल्यानंतर काही मिनिटात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोहन रावले यांनी पक्षातून हकालपट्टीची घोषणा केली.

दसरा मेळाव्यात मनोहर जोशी अपमान नाट्य प्रकरणावर अजून पडदा पडला नाही तोच सेनेत आणखी एका शिवसैनिकांने बंडाने दंड थोपटले. दक्षिण मुंबईत पाच वेळा खासदारकी भुषवणारे शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार मोहन रावले यांनी बंड पुकारलाय.

रावले यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या कार्यभारावर जोरदार हल्लाबोल केला. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेट देत नाहीत. मी खासदार असतानाही उद्धव ठाकरेंनी भेट द्यायला 4 वर्ष लावली. मग सामान्य शिवसैनिकांना काय न्याय मिळेल? असा खडा सवाल रावलेंनी उपस्थित केला. तसंच मिलिंद नार्वेकर हा पक्षातला बडवा असून सेनेला खड्‌ड्यात घालायला निघालाय. यामुळे शिवसेना हा दलालांचा पक्ष होत चाललेला आहे. कंत्राटदारांचा पक्ष झालाय अशी जळजळीत टीका रावले यांनी केली. मात्र त्यांच्या टीकेमुळे काही मिनिटातच कारवाई झाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रावले यांना पक्षातून काढण्यात आल्याची घोषणा केली.

विशेष म्हणजे, मला अस्तनीतले निखारे नको, अशा निखार्‍यांवर मी पाणी टाकणार नाही. ज्यांना सेनेतून जायचं असेल त्यांनी खुशाल जावे असा गंभीर इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. उद्धव यांच्या इशार्‍यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी चांगलीच धास्ती घेतली होती. विशेष म्हणजे मनोहर रावले यांनी 22 नोव्हेंबर रोजी मनसेच अध्यक्ष राज ठाकरे यांची घरी जाऊन भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर रावले नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. अखेर आज रावले यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आणि पक्षांने कारवाईही केली. या अगोदरही रामदास कदम यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण ती अंतर्गत वादावर होता. अगदी अलीकडेच मनोहर जोशी यांचं अपमाननाट्यही गाजलं आणि पंतांनी माफीनामाही सादर केला आता या पंक्तीत मोहन रावले जाऊन बसले आहे.

 

  • milind

    mohan rawle laalchi aahe

close