सरकारी हॉस्पिटलमधील दीड हजार कर्मचारी संपावर

December 2, 2013 3:19 PM0 commentsViews: 328

hospital worker02 डिसेंबर : सरकारी मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटल्समधील अस्थायी कर्मचार्‍यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यातील14 मेडिकल कॉलेज आणि 19 सरकारी हॉस्पिटलमध्ये हा संप सुरु झालाय.

एकूण 1 हजार 460 कर्मचारी संपावर गेले आहे. 22 वर्षांपासून हे कर्मचारी काम करतायत आणि हायकोर्टाने या सर्वांना कायम करण्याचे आदेश दिलेले आहेत. पण हे आदेश डावलून सरकारनं कर्मचार्‍यांना कायम केलेलं नाही. त्यामुळे नोकरीत कायम करावं या मागणीसाठी कर्मचार्‍यांची संप पुकारला आहे. पण या संपामुळे पेशंट्सना फटका बसतोय.

close