महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत चंद्रहार पाटील पराभूत

December 2, 2013 9:08 PM1 commentViews: 1377

maharashtra kesri02 डिसेंबर : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा प्रमुख दावेदार चंद्रहार पाटील याला पराभवाचा धक्का बसलाय. या पराभवामुळे चंद्रहारचं तिसर्‍यादा महाराष्ट्र केसरी मिळवण्याचं स्वप्न भंगलंय.

पुण्याच्या सचिन येलभर याने चंद्रहारला पहिल्याच फेरीत बाद केलं. गादी विभागात चंद्रहारने 3 मिनिटांच्या पहिल्या फेरीत फ्रंट ‘सालतो’ मारण्याचा प्रयत्न केला. त्यात सचिन मैदानाबाहेर गेल्यानं चंद्रहारला एक गुण मिळाला. त्यानंतर मिळालेल्या विश्रांतीनंतर सचिननं सलग दोन गुण मिळवत चंद्रहारला बाद केलं.

तर दुसरीकडे महाराष्ट्र केसरीचा प्रमुख दावेदार आणि दोन वेळा महाराष्ट्र केसरी पदाचा मानकरी नरसिंग यादवनं सोलापूरच्या गोपीनाथ घोडकेला सात गुणांनी पराभूत केलं. कुस्ती शौकिनांसाठी ही लढत डोळ्याचं पारणं फेडणारी ठरलीय.

  • Rohan Durge

    Bala sahebanch swapnaa————–

close