तीन वर्षांच्या चिमुरडीचा नरबळी ?

December 2, 2013 9:16 PM0 commentsViews: 518

yavatmal news02 डिसेंबर : यवतमाळ जिल्ह्यातल्या हिवरा संगममध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीचा नरबळी देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. गौरी गिरी या 3 वर्षांच्या मुलीचा नरबळी देण्यात आलाय, असा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.

गौरी पोर्णिमेच्या संध्याकाळी घरासमोरुन बेपत्ता झाली होती. दोन दिवसांनंतर तिचा मृतदेह घराजवळ बांधकाम सुरू असलेल्या एका घराच्या जिन्याखाली सापडला. तिच्या शरीरावर काही जखमा आढळल्या. या जखमा आणि मृतदेहाची अवस्था बघून आपल्या मुलीचा नरबळी दिल्याचा आरोप तिचे आई-वडिलांनी केलाय. याप्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना अटक केलीय.

हिवरा संगम येथील किसन गिरी हा मोल मजूरी करुन आपल्या कुटंुबाची देखभाल करतात. संध्याकाळच्या वेळेस घरी सर्वच जण असताना त्याची 3 वर्षांची गौरी नावाची मुलगी घरासमोरच्या रस्त्यावर खेळत होती. थोड्यावेळाने किसनची पत्नी रेखा ही बाहेर आली असता तिला गौरी दिसत नव्हती.

तेव्हा त्या सगळ्यांनी गौरीचा शोध घेतला. मात्र गौरी कुठेच दिसली नाही. त्यामुळे दुसर्‍या दिवशी त्यांनी महागाव पोलिसांत तक्रार दाखल केली. तिचा शोधाशोध सुरु असतानाच 2 दिवसानंतर गौरीचा मृतदेह किसनच्या घराच्या मागील बाजूला बांधकाम सुरु असलेल्या एका घराच्या जिन्याखाली आढळुन आला. त्यावेळी गौरीच्या शरीरावर काही जखमाही होत्या त्या शरीरावरच्या जखमा आणि मृतदेहाची अवस्था बघत गौरीच्या नातेवाईकांनी नरबळीची शक्यता वर्तवलीय. तीन वर्षांच्या गौरी हत्याकांडाने सगळीकडे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास विशेष गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय.

close