स्पेशल मुलांची, स्पेशल स्कूल

December 3, 2013 10:28 AM0 commentsViews: 91

रोहन कदम, मुंबई.

03 डिसेंबर : आज 3 डिसेंबर म्हणजेच ‘वर्ल्ड डिसऍबीलीटि डे’. शारीरीक अपंगत्व आणि कमतरता असणार्‍यांच्या समस्या जगापूढे याव्यात यासाठी संयुक्त राष्ट्रसंघासह विवीध संस्था 1992 पासून हा दिवस साजरा करत आहेत. मुंबईतही अशीच एक संस्था आहे जी आजच्या स्पर्धेच्या जगात शारीरीक आणि मानसिक समस्या असलेल्या मुलांना योग्य ते प्रशिक्षण देते.

मुंबईतली एक स्पेशल स्कूल… पॅराप्लेजिक फाऊंडेैशन… खास मुलांची खास शाळा. इथल्या मुलांच्या निरागसपणामागे दडल आहे त्यांच्या शिक्षकांचे अपार कष्ट. पॅराप्लेजिक फाऊंडेशनच्या संस्थापिका सुलभा वर्दे सांगतात की,” हि मुलं जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा पहिला आमचा फोकस फ क्त पुस्तकी शिक्षणावर नसतो.आम्ही त्यांना बॅंकेत घेउन जातो,त्यांना पोलीस स्टेशनला घेउन जातो. आताच काही महिन्यापूर्वी आमच्या टिमने पोलीस स्टेशनला जाऊन पोलीसांना राखी बांधली. अगदी रेल्वे स्टेशनला जाऊन कुठे तिकिट काढायचे, बसमध्ये बसलात तर कसा प्रवास करायचा, हे आतिशय महत्वात शिक्षण त्यांना मिळाले की ते उद्या जाऊन कुठेही नोकरी करू शकतील.”

या सेंटरच्या “संजिवनदिप” या प्रोजेक्टअंतर्गत मतिमंद, गतिमंद आणि कर्णबधिर मुलांना त्यांच्या गरजांप्रमाणे शिकवले जाते. शिवाय अपंग मुलांसाठी इथे फिजिओथेरपीची देखिल सोय करण्यात आली आहे तिही अगदी विनामुल्य. सध्या या सेंटरमध्ये पहिली ते दहावीचे102 विदयार्थ्यी शिकत आहेत, आणि त्यांना साथ मिळतेय ती संस्थेच्या दहा सेवाभवी शिक्षकांची.

“या मुलांना ज्या आपल्या शारीरीक गरजा आहेत, साध्या साध्या रोजच्या प्राथमिक गरजा,जसे कडी लावणे, लाईटचे बटण चालू- बंद करणे,टॉयलेटला जाताना पॅंट काढणे इतपासून त्यांना सगळ काही शिकवले जाते” या मुलांसाठी आयुष्य सोपे नसेलही कदाचित पण या सेंटरच्या मदतीने आत्मनिर्भर होऊ पहाण्याच्या या मुलांच्या प्रयत्नांना आणि खंबीरपणे न डगमगता त्यांच्या पाठिशी उभ्या रहाणार्‍या त्यांच्या शिक्षकांना आयबीएन लोकमतचा सलाम.

close