बाबासाहेबांच्या स्मारक स्वरुपावरुन वेगवेगळे मतप्रवाह

December 3, 2013 11:12 AM0 commentsViews: 574

babasaheb smarakउदय जाधव, मुंबई

03 डिसेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची साडेबारा एकर जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही जमीन मिळवण्यासाठी सर्व दलित संघटनांनी संघर्ष केला होता. पण आता वेगळाच संघर्ष निर्माण होतो. बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक नेमक कसे असावे यासाठी प्रशासन, सत्ताधारी नेते आणि विरोधक यांचे वेगवेगळे प्रस्ताव आहेत. पण आंबेडकरी अनुयायी मात्र हे स्मारक लोकाभिमुख असावे अशी मागणी करत आहेत.

इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी सर्वप्रथम चौदा वर्षांपूर्वी मागणी केली होती राष्ट्रवादीचे नेते विजय कांबळे यांनी. आता हा प्रश्न सुटल्यानंतर या ठिकाणी बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक कसे असावे याचे संकल्पना चित्रदेखील त्यांनी तयार केले आहे. त्यानुसार प्रस्तावित स्मारकाच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी, विपश्यना केंद्र, बाबासाहेबांचा भव्य पुतळा आणि दलित जनतेसाठी सहा डिसेंबर आणि चौदा एप्रिलच्यादिवशी निवासाची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे हे स्मारक लोकाभिमुख असल्याचा दावा विजय कांबळे यांनी केला.

सत्ताधारी नेत्यांबरोबरच विरोधी पक्षातल्या दलित संघटनांनी देखील बाबासाहेबांच्या स्मारकाचे संकल्पचित्र तयार केले. आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी या स्मारकाच्या आराखड्यासंदर्भात आग्रही भूमिका घेतली आहे.

राजकीय नेत्यांबरोबरच एमएमआरडीएने देखील स्मारकाच्या आराखड्या संदर्भात आराखडे मागितलेत. तसंच सर्वोत्कृष्ट आराखड्यास एक कोटी रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. त्यामुळे आधी इंदू मिलच्या जागेसाठी संघर्ष आणि आता त्या जागी स्मारक कसे उभारावे याच्या संकल्पनाचित्र आराखड्यासाठी देखील संघर्ष होताना दिसून येत आहे.

close