भोपाळ गॅस दुर्घटनेला 29 वर्षं, पीडितांना अजूनही न्याय नाही

December 3, 2013 11:48 AM0 commentsViews: 137

03 डिसेंबर : भोपाळ गॅस दुर्घटनेला आज मंगळवारी 29 वर्षं पूर्ण झाली पण इतकी वर्षं उलटूनही या दुर्घटनेच्या खुणा पीडितांमध्ये अजूनही ताज्या आहेत.

 

युनियन कार्बाईड कंपनीतून झालेल्या मिथाईल आयसोसायनेट वायूच्या गळतीने तब्बल 3000 लोकांचा बळी घेतला तर 5 लाख लोकांनी याचे दुष्परिणामही भोगले पण पीडितांचा कायदेशीर लढा अजूनही सुरू आहे.

 

29 वर्ष उलटूनही पीडितांना अजूनही न्याय मिळालेला नाहीये. या दुर्घटनेतल्या बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज भोपाळमध्ये एका शोकसभेचे आयोजन करण्यात आलं आहे.

close