जस्टिस गांगुलींनी मानवी हक्कच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावं !

December 3, 2013 11:19 AM0 commentsViews: 89

ganguly03 डिसेंबर : लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टातले माजी न्यायाधीश ए.के.गांगुलींची पश्चिम बंगाल मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावी आशी मागणी तृणमूल काँग्रेस आणि भाजपने केली आहे. गांगुली यांच्यावर एका इंटर्न मुलीने लैंगिक अत्याचारा झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतल आहे.

गांगुली हे सध्या पश्चिम बंगाल मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यांची या पदावरुन काढुन टाकण्याची मागणी काँग्रेसने केली होती. आता तृणमूल काँग्रेस आणि भाजपनही या मागणीला पाठिंबा दिला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांवी ट्विट करुन ही मागणी केली असून गांगुली यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. माजी ऍटर्नी जनरल सोली सोराबजी आणि भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मात्र गांगुली यांची पाठराखण केली आहे.

close