सांगलीमध्ये शिवसेनेचा जबरदस्त धुमाकूळ

February 14, 2009 10:54 AM0 commentsViews: 3

14 फेब्रुवारी, सांगली व्हॅलेंटाईन डे साजरा करणार्‍या प्रेमीयुगुलांचं लग्न लावून देणार्‍या शिवसेनेनं मिरजमध्ये आणखीनच धुमाकूळ घातलाय. दरम्यान मिरजमध्ये शिवसैनिकांनी सर्व मर्यादा ओलांडत एका तरुणाचं गाढवाशी लग्न लावून दिलं. मिरज मेडिकल कॉलेजच्या मैदानावर लग्न लावून देण्यात आलं आहे. " व्हॅलेन्टाइन डेच्या नावाखाली अश्लील कृत्य करणा-यांवर कारवाई करणार, असं सांगलीतले शिवसेनेचे कार्यकर्ते शशिकांत वाघमोडे यांनी सांगितलंय. दरम्यान शिवसेनेच्या या हुल्लडबाजीवर दोषींवर कडक कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

close