ऍसिड विक्रीबद्दल राज्य सरकारांनी धोरण निश्चित करावे-सुप्रीम कोर्ट

December 3, 2013 3:05 PM0 commentsViews: 67

sc03 डिसेंबर : सहज उपल्बध होणार्‍या ऍसिडमुळे, ऍसिड हल्ल्यांनमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालायने या विषयात दखल घेत सर्व राज्य सरकारांना निर्देश दिले असून ऍसिड विक्रीबद्दल राज्य सरकारांनी 31 मार्च 2014पर्यंत धोरण निश्चित करावं असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.

 
कोणत्याही ऍसिड हल्ल्या झाल्यानंतर ऍसिड कुठून आले याची न्यायदंडाधिकार्‍यांनी चौकशी करावी असही सुप्रीम कोर्टांने आपल्या आदेशात म्हणले आहे. याच बरोबर ऍसिड हल्लातल्या पीडितांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारांनी योजना आखाव्यात अस सर्वोच्च न्यायालायने राज्य सरकारांना सांगितले आहे.

close