जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करणारच -मुख्यमंत्री

December 3, 2013 3:39 PM0 commentsViews: 263

cm pruthviraj chavan03 डिसेंबर : जादूटोणाविरोधी विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांडणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक मंजूर करणारच, असा निर्धार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

या विधेयकाला काही पक्षांचा विरोध आहे पण विरोध असला तरी हे विधेयक मंजूर होईल आणि या विधेयकाची काटेकोर अंमलबजावणी करू असंही ते म्हणाले. तसंच जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करणं हीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना खरी श्रद्धांजली असेल असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, डॉ.दाभोळकर खून प्रकरणी सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलाय. धर्मांध शक्तींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

close