विश्व मराठी साहित्य संमेलन सॅनहोजेत सुरू होणार

February 14, 2009 12:03 PM0 commentsViews: 2

14 फेब्रुवारी, सॅनहोजे अर्पणा वेलणकर विश्व मराठी साहित्य संमेलन सॅनहोजेमध्ये सुरू होतंय. संमेलनासाठी अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे, पं ह्रदयनाथ मंगेशकर, आणि सगळे मान्यवर पाहुण्यांचं सॅनहोजेमध्ये विमानतळावर स्वागत करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि महामंडळाच्या काही पदाधिकार्‍यांबरोबर 225 सदस्यांचं पथक गुरूवारी दुपारी अमेरिकेत दाखल झालं. अनेक मान्यवर साहित्यिक , कलाकार आणि गायक संगीतकार यांचा या पथकात समावेश आहे. तर इतर 150 साहित्य रसिक स्वखर्चानं अमेरिकेत दाखल झालेत. सॅन होजे जवळच्या मिलपिटास या उपनगरातल्या इंडिया कम्युनिटी सेंटरमध्ये सकाळी या संमेलनाचा सोहळा होणार आहे.

close