सरकारचं अपयश, INS विक्रांतचा होणार लिलाव

December 3, 2013 6:39 PM2 commentsViews: 1535

ins vikrant03 डिसेंबर : भारतीय नौदलाची एकेकाळी शान आणि 1971 च्या युद्धात दैदिप्यमान अशी कामगिरी बजावणार्‍या INS विक्रांतचा राज्य सरकारच्या कंरटेपणामुळे लिलाव होणार आहे. विक्रांतचा संग्रहालय म्हणून सांभाळ करण्यात राज्य सरकार आणि नौदल अपयशी ठरल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय.

विक्रांतनं 1971 च्या युद्धात निर्णायक भूमिका बजावली होती. 4 मार्च 1961 ला विक्रांतचा नौदलामध्ये समावेश झाला होता. जानेवारी 1997 मध्ये विक्रांत युद्धनौका सेवेतून निवृत्त झाली होती. निवृत्त झाल्यानंतर मुंबईच्या समुद्र किनार्‍यावर विक्रांतचं म्युझियम केलं होतं. विक्रांतची सांभाळण्याची जबाबदारी ही राज्य सरकार आणि नौदलाकडे होती.

विक्रांतच्या संग्रलयासाठी राज्य सरकारने सुरुवातीला 5 कोटींचा निधी उपलब्ध केला होता. दोन वर्षांपूर्वी विक्रांतच्या सांभळण्यासाठी एमएमआरडीएच्या अंतर्गत एक योजना करण्यात आली होती. एमएमआरडीएने विक्रांतच्या देखभालीसाठी 500 कोटींचा खर्च सांगितला होता. मात्र राज्य सरकारने सरळ हातवर करून 500 कोटींचा खर्च देण्यास नकार दिला. यासाठी निविदा मागवण्यात आल्यात. पण यासाठी सरकारने योग्य तो पाठपुरावा केला नाही. त्यामुळे सरकारच्या करंटेपणामुळे विक्रांतचा लिलाव होणार आहे.

  • Shreyas Hingmire

    SAD NEWS FOR INDIA

  • Sagar

    can’t do that…..

close