राष्ट्रवादी काँग्रेस 24 जागांवर ठाम

February 14, 2009 1:07 PM0 commentsViews: 3

14 फेब्रुवारी दिल्लीदिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. ही बैठक दिल्लीतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी पावणेचार तास चालली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीतल्या जागावाटपाबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस 24 जागांवर ठाम आहे. तर राज्यात समाजवादी पक्षाला एक जागा सोडण्याची तयारीही राष्ट्रवादीनं दर्शवली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, आर. आर. पाटील आणि इतर ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. आता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक मुंबईत होणार आहे. दरम्यान, जागावाटपाच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढू असा विश्वास दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला.

close