कृपांच्या विरोधात होणार खटला दाखल?

December 3, 2013 8:24 PM0 commentsViews: 637

Image img_192652_krupa_240x180.jpg03 डिसेंबर : मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि आमदार कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात खटला दाखल करण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी विधानसभा अध्यक्षांकडे मागितलीय.

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार एखाद्या आमदाराविरोधात खटला दाखल करायचा असेल तर पोलिसांनी विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. त्यानुसार मुंबई पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कृपाशंकर सिंह तशी परवानगी मागितलीय. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर सिंह अडचणीत आले होते.

त्यामुळेच त्यांना मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद सोडावं लागलं होतं. गेल्या वर्षी कृपाशंकरसिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

close