जळगावच्या मुलांनी साजरा केला वृध्दाश्रमात व्हॅलेंटाईन डे

February 14, 2009 10:38 AM0 commentsViews: 4

14 फेब्रुवारी जळगावजळगावच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीनं व्हॅलेंटाईन डे साजरा केला. व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन या मुलांनी वृध्दाश्रमातील आजी-आजोबांबरोबर केलं. जळगावच्या सावखेड्यात मातोश्री वृद्धाश्रम आहे. त्या वृद्धाश्रमाला जळगावच्या उज्ज्वल शाळेतल्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. यामुळे या निराधार वृद्धांनाही अतिशय आनंद झाला. आगळ्यावेगळ्या पद्धतीनं हा दिवस साजरा करून एकप्रकारे या मुलांनी एक अनोखा संदेशच दिला.

close