अखेर नारायण साई पोलिसांच्या ताब्यात

December 4, 2013 9:05 AM1 commentViews: 1888

Gujarat-police-4166 04 डिसेंबर : लैंगिक शोषण प्रकरणी फरार गेले 2 महिन्यान पासून घोषित असलेल्या नारायण साईला अखेर दिल्ली पोलिसांना आज बुधवारी पहाटे अटक करण्यात यश आले आहे. त्याला  दिल्ली – पंजाबच्या सीमेवर त्याला अटक करण्यात आली.

गेल्या दोन महिन्यां पासून गुजरात आणि दिल्ली पोलिस मिळून नारायण साईची शोध मोहीम हाथी घेतली होती. या आधीही नारायण साईला शोधण्यासाठी सुरत पोलिसांनी 5 राज्यांमध्ये पोलिसपथके रवाना केली होती.  सूत्रांनकडुन माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी बुधवारी दिल्ली- पंजाबच्या सीमेवर छापा टाकण्यात आला होता.  तिथे नारायण साईला अटक करण्यात आली.  अटकेच्या वेळी नारयण साई  शीख वेशभूषेत होता.

नारायण साई आसारामबापू यांचा मुलगा आहे. या दोघांच्या विरोधात आश्रमातल्या दोन बहिणींनी सुरत येथे लैंगिक छळाची तक्रार दाखल केली असून या प्रकरणी आसाराम बापू यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.  त्याच्यासह आणखी चार जणांनाही अटके करण्यात आली आहे.  त्याला दिल्ली येथे आणण्यात आले असून क्राईम ब्रांचच्या कार्यालयात त्याची चौकशी सुरू आहे.

  • Patingrao Patil

    asaram & narayan doghanchi narko test karayala havi

close