दिल्लीत दुपारपर्यंत 46 टक्के मतदान

December 4, 2013 1:45 PM0 commentsViews: 1176

chatisgad election404 डिसेंबर : दिल्ली विधानसभा निवडणुकीत चांगलं मतदान होतंय. दुपारी 2 वाजेपर्यंत तब्बल 46 टक्के मतदानाची नोंद झालीय. काँग्रेस आणि भाजप अशी सरळ लढत असलेल्या या निवडणुकीत आम आदमी पार्टीमुळे रंगत निर्माण झालीये.

 

आम आदमी पार्टीची ही पहिलीच निवडणूक आहे पण या नव्या पक्षाने काँग्रेस आणि भाजपसमोर आव्हान उभं केलेलं आहे. दिल्लीत एकूण 1 कोटी 23 लाख मतदार आहे आहेत आज मतदान करता यावं यासाठी सरकारी कार्यालयांना सुटी देण्यात आलीये, तर खासगी कार्यालयांनी सवलत दिलेली आहे.

 

राजकारणाचं सत्ता केंद्र असणार्‍या दिल्लीतील दिल्लीकर नेते आज मतदानाला बाहेर पडले. गांधी परिवारानेही दिल्लीच्या या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान केलं. सोनिया आणि राहुल गांधींनी निर्माण भवन मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं. तर प्रियांका गांधींनी लोधी इस्टेटमधल्या केंद्रातून मतदान केलं.

close