माथेफिरू पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

December 4, 2013 9:59 AM1 commentViews: 1321

crime scene04 डिसेंबर :मुंबईजवळच्या भाईंदरमध्ये एका माथेफिरू पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून, तिच्या शरीराचे चार तुकडे करून त्यातले 3 तुकडे फ्रीजमध्ये तर एकतुकडा बाथरूम लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

भाईंदरमधल्या गोल्डन नेस्ट परिसरातल्या नक्षत्र टॉवरमध्ये 14व्या मजल्यावर ही घटना घडली आहे. हा सर्वप्रकार आरोपीच्या भावाने उघडकीस आणल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा शोध घ्यायला सुरू केला तेव्हा त्यांना 3 तुकडे फ्रीजमध्ये तर एकतुकडा बाथरूममध्ये सापडला. ही हत्या दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याचा संशय मृतदेहाच्या अवस्थेवरून पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेतील माथेफिरू पती हा बेरोजगार होता आणि पत्नीसोबत त्याचं रोज भांडण व्हायचं अशी माहिती शेजार्‍यांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या हत्याकांडामध्ये वापरण्यात आलेलं शस्त्र अजूनही सापडले नाहीये. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • Manoj Jadhav

    फाशी ची सजा मिळायला हावी ?

close