औरंगाबाद प्रीमिअर लीगला सुरुवात

February 14, 2009 3:26 PM0 commentsViews: 2

14 फेब्रुवारी औरंगाबाद20-20 क्रिकेटचं आकर्षण दिवसेंदिवस वाढतंय. त्यामुळे आयपीएलप्रमाणे औरंगाबाद शहरात औरंगाबाद प्रीमिअर लीगला सुरुवात झाली आहे. नऊ दिवस चालणा-या या स्पर्धेचं उदघाटन राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील, उर्जा मंत्री सुनील तटकरे, अभिनेत्री अमृता राव यांच्या हस्ते करण्यात आलं.गेल्यावर्षी अतिशय लोकप्रिय झालेल्या औरंगाबाद प्रीमिअर लीगला या वर्षीही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. उदघाटनासाठी आलेली अभिनेत्री अमृता राव सर्वाचंच आकर्षण ठरली. स्पर्धेत एकूण आठ संघाचा सहभाग असून विजेत्या संघास अडीच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी स्थानिक खेळाडू कित्येक दिवसांपासून तयारी करत होते. यातील प्रत्येक टीममध्ये तीन आयकॉन खेळाडू आहे. बीसीसीआयची आयपीएल स्पर्धा प्रचंड लोकप्रिय ठरली त्याचप्रमाणे एपीएल ही खूपच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे पुढील वर्षी महाराष्ट्र क्रिकेट लीगची सुरुवात करणार असल्याचं स्पर्धेचे संयोजक संगतात.

close