राज्यसभेची सातवी जागा जोशींना देऊ शकता -आठवले

December 4, 2013 4:22 PM0 commentsViews: 1561

ramadas athavale04 डिसेंबर : राज्यसभेच्या सातवी जागा आपल्याला नकोय, सातवी जागा जर मनोहर जोशी यांना देत असाल तर द्यावी पण आपल्याला सहावी जागा द्यावी अशी स्पष्ट भूमिका रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले मांडली. आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

येत्या फेब्रुवारी महिन्यात राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी आता जुळावजुळवीला सुरुवात झालीय. मनोहर जोशी यांच्या सातव्या जागेसाठी शिवसेना पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरु झालीय. त्यासंदर्भात शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांशी आपली भेट झाली असून उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलंय.

आपल्याला सुरक्षित जागा हवी, अशी मागणीही आठवले यांनी केलीय आणि ही जबाबादारी उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांची असल्याचं त्यांनी म्हटलंय. देशभरात कुठूनही राज्यसभेसाठी उमेदवारी स्वीकारण्याची तयारीही त्यांनी दाखवलीय. या अगोदरही आठवलेंनी सातव्या जागेसाठी नकार दिला होता. जर सातवी जागा द्यायची असेल तर त्याचा निर्णय उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांनी घ्यावा. उगाच सातव्या जागेवर उभं राहुन एखादा उमेदवार उभा राहिला तर अडचण होईल त्यामुळे रिस्क कशाला घ्यायची असं सांगत सातव्या जागेसाठी आठवले यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला होता.

close