मनोरुग्णाची जळत्या चितेत उडी घेऊन आत्महत्या

December 4, 2013 5:29 PM0 commentsViews: 1433

pune news04 डिसेंबर : जळत्या चितेमध्ये उडी घेऊन एका मनोरुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. केरबा गोविंद चव्हाण असं व्यक्तीच नाव होतं. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

आज दुपारी धनकवडी मधल्या स्मशानभूमीमध्ये मुकुंद परदेशी यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते. त्यावेळी चव्हाण तिथे आले. चव्हाण हे मनोरुग्ण होते. अनेकदा ते स्मशानभूमीत येऊन बसायचे त्यामुळे इथल्या वॉचमननी त्यांना हटकलं आणि स्मशानभूमीच्या बाहेर नेऊन सोडलं.

त्यानंतर दुसर्‍या गेटने ते परत आत आले. आणि जळत असलेल्या परदेशी यांच्या चितेमध्ये त्यांनी उडी घेतली. कशाचा आवाज झाला म्हणून वॉचमननं येऊन पाहिल्यावर चव्हाण हे या चितेमध्ये जळत असल्याचं दिसलं. या नंतर पोलिसांच्या मदतीने अग्निशामक दलाला बोलावून चव्हाण यांना बाहेर काढण्यात आलं. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. चव्हाण हे मनोरूग्ण असल्याने त्यांनी असा प्रकार केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

close