पाकचा दुटप्पीपणा उघड

February 14, 2009 3:18 PM0 commentsViews: 2

14 फेब्रुवारीदहशतवाद्यांच्या शोधाबाबत पाकचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. लष्कर-ए-तोयबाच्या नेत्याला अटक झालेली नाही. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानात सहाजणांना अटक केल्याची माहिती तिथल्या अंतर्गत सुरक्षा मंत्र्यांनी दिली होती. परंतु आता तिथल्या काही प्रसिद्धीमाध्यमांनी सरकारी सूत्रांचा हवाला देऊन अशी कोणतीच अटक झालेली नाही असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा सरकारनं केल्याचं सांगण्यात येतं आहे. त्यामुळे दहशतवाद्यांच्या शोधामागची पाकिस्तानची दुटप्पी भूमिका स्पष्ट झाली आहे.

close