मुलाच्या जामिनासाठी नारायण राणेंनी केला होता पर्रिकरांना ‘फोन’

December 4, 2013 7:11 PM1 commentViews: 5247

mnohar parikar04 डिसेंबर : टोल नाक्यावर तोडफोड केल्यानंतर नितेश राणे यांना अटक करण्यात आली होती. मात्र आपल्या मुलाला जामीन मिळावा यासाठी उद्योगमंत्री आणि त्यांचे वडील नारायण राणे यांनी मला फोन करून नितेशला जामीन देण्याची मागणी केली होती मात्र आपण त्यांचीही मागणी फेटाळून लावली असा गौप्यस्फोट गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलाय.

नितेश राणेंच्या राड्यामुळे गोवा सरकारचं 6 ते 7 लाख रुपयांचं नुकसान झालंय. या प्रकरणी कायद्यानुसार सर्व कारवाई होईल. गोव्यात अशा प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असंही पर्रिकर यांनी ठणकावून सांगितलं.

मंगळवारी गोव्यातील उत्तर गोवा जिल्ह्यातल्या धारगळ गावात चेकपोस्टवर उद्योग मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांना टोल नाक्यावर अडवल्यामुळे त्यांचा ‘स्वाभिमान’ दुखावला त्यामुळे त्यांनी टोल नाक्यावरच्या कर्मचार्‍यांना धक्काबुक्की केली आणि टोलची तोडफोड केली.

या प्रकरणी नितेश राणे यांच्यासह नऊ जणांनाही अटक करण्यात आली. त्यांच्या मारहाणीत टोलचे तीन कर्मचारी जखमी झाले. राणेंसह नऊ जणांना अटक करण्यात आली. मात्र मध्यरात्री सशर्त जामीनही देण्यात आला. मात्र या काळात आपल्या मुलांच्या पराक्रमावर नारायण राणे धावून आले. त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना फोन लावून सोडून देण्याची विनंती केली. मात्र पर्रिकर यांनी त्यांची विनंती फेटाळून लावली. तुम्हाला तुमच्या मुलांना सोडावयचं असेल तर कोर्टात जाऊन परवानगी घ्या असा सल्ला पर्रिकर यांनी दिला. तसंच यापुढे गोव्यात अशी राडेबाजी खपवून घेतली जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

  • Ramesh Patil

    congrats Mr Parrikar for bold decision in not conceding Mr Rane;s rdemand

close