दिल्लीत 66 टक्के विक्रमी मतदान

December 4, 2013 7:17 PM0 commentsViews: 806

delhi election new04 डिसेंबर : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी मतदान झालंय. संध्याकाळपर्यंत तब्बल 66 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याची माहिती दिल्लीच्या निवडणूक आयुक्तांनी दिलीय.

संध्याकाळपर्यंत अनेक मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे मतदानाची मुदत साडे सात वाजेपर्यंत वाढवण्यात आलीय. हीसुद्धा दिल्लीच्या इतिहासातली पहिलीच वेळ आहे. याआधीचा 65.75 टक्के मतदानाचा विक्रम यावेळी मोडला.

काँग्रेस आणि भाजप अशी सरळ लढत असलेल्या या निवडणुकीत आम आदमी पार्टीमुळे रंगत निर्माण झालीये. आम आदमी पार्टीची ही पहिलीच निवडणूक आहे पण या नव्या पक्षाने काँग्रेस आणि भाजपसमोर आव्हान उभं केलेलं आहे. दिल्लीत एकूण 1 कोटी 23 लाख मतदार आहे आहेत. एकूण 77 जागांसाठी इव्हीएम मशीनमध्ये उमेदवारांचं भवितव्य बंद झालंय.

close