हरियाणा पोलिसांचा अजब न्याय

February 14, 2009 2:21 PM0 commentsViews: 5

14 फेब्रुवारीहॅलेंटाईन डेला हरियाणातही विरोध झाला.आणि हा विरोध चक्क एका पोलीस अधिका-याने केला. हरियाणातल्या जिंद नावाच्या शहरात एका जोडप्याला मूलाराम नावाच्या पोलीस उपनिरीक्षकाने चक्क बदडून काढलं. नंतर त्याने त्या दोघांना अक्षरशः फरफटत पोलीस स्टेशनपर्यंत नेलं. आणि पोलीस कोठडीत डांबून ठेवलं. मूलारामने या जोडप्याला गलिच्छ भाषेत शिवीगाळही केला. पण हा प्रकार उघडकीस आल्यावर मूलारामला ताबडतोब निलंबित करण्यात आलं आहे. जिंदचे पोलीस अधीक्षक सतिश बालन यांनी मान्य केलं की मूलारामने आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केला.

close