काश्मीरवरुन पुन्हा पेटणार युद्ध ?

December 5, 2013 9:25 AM0 commentsViews: 232

05 डिसेंबर : काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानचं पुन्हा युद्ध होण्याची शक्यता असल्याचा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिला आहे. बुधवारी पाकव्याप्त काश्मीरच्या बजेट सेशनदरम्यान केलेल्या भाषणात त्यांनी हा इशारा दिल्याची माहिती आहे. आपण काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर लावून धरणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

 

पाकिस्तानला भारताबरोबर शस्त्र स्पर्धा करायची नाही आणि नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीची अंमलबजावणी करायची आहे, असंही ते म्हणाले. दरम्यान, पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने या वादग्रस्त वक्तव्याचा इन्कार केला असून पाकिस्तान कधीही युद्ध जिंकू शकत नाही, असे सडेतोड उत्तर भारातचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिले आहे.

 

या सगळ्या घडामोडीनंतर ‘शरीफ अस काहीही बोलले नाही ‘ असं म्हणत पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने माघार घेतली असून भारत आणि पाकिस्तानमधले मतभेदाचे मुद्दे शांततेने सोडवले पाहिजेत असेही पाकिस्तानने म्हटले आहे.

close