कुंभमेळा रद्द करा – संभाजी ब्रिगेडची मागणी

December 5, 2013 12:50 PM0 commentsViews: 897

Image img_75312_kumbhmela_240x180.jpg05 डिसेंबर : संभाजी ब्रिगेडने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून नाशिकमधला कुंभमेळा रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. राज्य सरकारने कुंभमेळ्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी तो पैसा बहुजन जनतेच्या विकासासाठी वापरावा, असं मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलं होतं.

 

त्यानंतर फेसबुकवर संभाजी राजेंविरोधात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले. संभाजी ब्रिगेडने आक्षेपार्ह लिखाण करणार्‍याचा निषेध केला असून असे लिखाण करणार्‍यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

close