संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

December 5, 2013 9:58 AM0 commentsViews: 78

Image img_10471_parliament_240x180.jpg05 डिसेंबर : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही सभागृहांच्या दिवंगत सदस्यांना आणि गायक मन्ना डेंसह इतर मान्यवरांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. त्यापूर्वी राज्यसभेत दहशतवादाच्या मुद्द्यावरून थोडासा गदारोळ उडाला. अधिवेशनात कामाकाजासाठी फक्त 12 दिवस मिळणार आहेत.

या कालावधीत जातीय हिंसा विरोधी विधेयक, महिला आरक्षण विधेयक आणि लोकपाल विधेयक ही महत्त्वाची विधेयक सरकारतर्फे मांडली जाणार आहेत. महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर झाल आहे, तर लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे असून राज्यसभेने त्यामध्ये काही दुरुस्ती सुचवल्या आहेत. पण, यापैकी कोणतेही विधेयक भाजप सहजासहजी मंजूर होऊ देण्याच्या मनस्थितीत नाही.

त्यातच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपची स्थिती मजबूत झाल्याचे दिसून येत. त्यामुळे भाजप अधिक आक्रमक असल्याचे दिसून येते. यानंतर फेब्रुवारीमध्ये होणार्‍या अधिवेशनात पुरवणी अंदाजपत्रक मांडले जाईल आणि त्यामध्ये इतर महत्त्वाचे कामकाज होण्याची अपेक्षा नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशन सरकारची कसोटी पाहणारे ठरणार आहे.

close