सलमानला दिलासा, साक्षीदारांची पुन्हा तपासणी

December 5, 2013 1:32 PM0 commentsViews: 347

Image salman_khan_on_sohil_300x255.jpg05 डिसेंबर : सलमानच्या ‘हिट अँड रन’ केस प्रकरणाची पुन्हा नव्याने सुनावणी करण्याचे आदेश आज गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयाने दिले. या केसची पुढची सुनावणी 24 डिसेंबरला होणार आहे.

मुंबईत 2002 मध्ये अभिनेता सलमान खाननं वेगात गाडी चालवून रस्त्यावर झोपलेल्या चौघांना चिरडले होते. त्यात एकाचा दुदैर्वी मृत्यू झाला होता तर इतर तिघे जखमी झाले होते. या प्रकरणी सलमानवर सदोष मनुष्यावधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबई सत्र न्यायालायने सलमानवर कारवाई करण्याचे आदेशही दिले होते. पण सलमानने या आदेशांना आव्हान देत घडलेल्या प्रकाराची पुन्हा तपासणी करण्यात यावी अशी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने आज सलमानची याचिका मान्य करून पुन्हा सर्व पुरावे आणि साक्षीदारांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे सलमानला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

 

close