‘कस्तुरीरंगन’ला राणेंचा विरोध, राजीनामा देण्याचा इशारा

December 5, 2013 4:53 PM0 commentsViews: 1513

Image img_210892_rane_240x180.jpg05 डिसेंबर : पश्चिम घाटाबाबतच्या कस्तुरीरंगन अहवालावरून पुन्हा राजकारण तापतंय. बुधवारी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली. कुठल्याही परिस्थितीत या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करू नये असं राणेंनी ठणकावलंय. गरज पडल्यास आपण मंत्रिपदाचा राजीनामा देवू आणि रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी दिलाय.

कस्तुरीरंगन समितीच्या शिफारसीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील 192 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 195 गावांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर केलंय. त्यामुळे या गावांमध्ये खाणकाम, रेती उत्खनन तसंच पर्यावरणाला हानी पोहोचवणार्‍या उद्योगांना मनाई करण्यात आली आहे.

राणे कडाडले

कोकणाला जाचक असणार्‍या शिफारसी लागू केल्या तर मी मंत्रीपदाचा राजीनामा देईन. लोकांसाठी रस्त्यावर उतरेन, पण कोणत्याही परिस्थितीत या नियमांची अंमलबजावणी होऊ देणार नाही… कोणी काहीही म्हटलं तरी चालेल त्याची मला पर्वा नाही. पण या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी येणार्‍या वनअधिकार्‍यांना कोकणात पाय ठेऊ देणार नाही. त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी मी जुमानणार नाही. पालकमंत्री असूनही आपल्याला कल्पना न देता वनअधिकारी जातातच कसे ? या निर्णयामुळे कोकणात विकास कामांसाठी वाळू मिळत नाही. घरं दुरुस्त करायला परवानगी नाही. रोजच्या कामाला लाकूड नाही. झाडाचा पालासुद्धा तोडता येत नाही, तर कोकणच्या माणसांनी जगायचं कसं? कोकणचा विकास तर दूरच राहिला अशी भीती राणेंनी व्यक्त केली.

यात नारायण राणेंचे नेमके काय हितसंबंध आहेत?

1. सिंधुदुर्गात 80 टक्क्याहून जास्त ग्रामपंचायती काँग्रेसकडे आहेत, त्यामुळे अहवालाची अंमलबजावणी झाली तर याचा फटका काँग्रेसला आणि परिणामी राणेंना बसू शकतो
2. गाडगीळ आणि कस्तुरीरंगन अहवालामुळे लागू करण्यात आलेल्या गौण खनिज बंदीमुळे रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या व्यावसायिकांचा
सत्ताधार्‍यांविरोधात असंतोष आहे
3. येणार्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे संभाव्य उमेदवार निलेश राणे यांना या असंतोषाचा फटका बसण्याची शक्यता
4. रत्नागिरीत आणि सिंधुदुर्गात येऊ घातलेल्या उद्योगधंद्यांसाठी जमीन संपादनात कस्तुरीरंगन रिपोर्टच्या अंमलबजावणीमुळे अडचणी येण्याची शक्यता आहे.

close