उसाचा दर कारखान्याच्या उत्पन्नावर ठरणार !

December 5, 2013 2:12 PM0 commentsViews: 572

shugarcane05 डिसेंबर : राज्य सरकारनं ऊसदराबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. कारखान्याच्या उत्पन्नावर आधारीत ऊसदर द्यावा असे निर्देश राज्य सरकारने दिले आहे. तसंच यासाठी ऊस नियंत्रण मंडळाचीही स्थापना केलीय.

आगामी काळात रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार या कायद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली हे मंडळ काम करणार आहे. त्यात शेतकर्‍यांचेही 5 प्रतिनिधी असणार आहे. साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय.

यामुळे ऊसदराचा तिढा कायमचा सुटेल असा विश्वास साखर कारखानदारांनी व्यक्त केलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सशर्त पाठिंबा दिलाय. कारखानदारांनी अटींचा भंग केला तर त्यांची शिक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला स्वाभिमानीनं विरोध केलाय. दरम्यान, दुसरीकडे उद्या शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीकडेही राज्यातल्या कारखानदारांचं आणि शेतकर्‍यांचं लक्ष लागलंय. या बैठकीतून बफर स्टॉक जाहीर करण्यात यावा तसंच कारखान्यांवर पुन्हा कर्जाचा बोजा वाढू देऊ नये अशी अपेक्षा कारखानदार व्यक्त करत आहेत.

close