चैत्यभूमीवर गर्दी

December 5, 2013 9:44 PM0 commentsViews: 124

05 डिसेंबर : उद्या 6 डिसेंबर…डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन. यानिमित्तानं दादरला चैत्यभूमीवर अनुयायांची मोठी गर्दी उसळते. लाखो लोक बाबासाहेबांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी जमतात. राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपर्‍यातून बाबासाहेबांचे अनुयायी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी येत आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कवर जोरदार तयारी सुरु आहे. मदत आणि पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी आज चैत्यभूमीला भेट देऊन तिथली पाहणी केली.

close