उडीद घोटाळा : क्षीरसागर यांच्यावर कारवाई कधी?

December 5, 2013 10:01 PM0 commentsViews: 442

05 डिसेंबर : बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेचा घोटाळा गाजतोय. त्यापाठोपाठ कोट्यवधी रुपयांचा ‘उडीद घोटाळा’ उघडकीला आला. आयबीएन लोकमतनंही त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानंतर कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार पणन विभागानं या घोटाळ्याच्या चौकशीत लक्ष घातलं. या प्रकरणात योग्य ती फौजदारी कारवाई करण्यात यावी असे आदेश पणन विभागाच्या अप्पर सचिवांनी काढले. हे आदेश पणन संचालकांनी बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना पाठवले. मात्र, अजूनही याप्रकरणात कुणावरही कारवाई झालेली नाही.

बीडमधल्या गजानन सहकारी बँक आणि तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर आहेत. त्यांच्यासह वेगवेगळ्या विभागांच्या अधिकार्‍यांवर कारवाईचे हे आदेश अंमलात कधी आणले जाणार, हा प्रश्न आहे. मंत्रालयातून आलेले आदेशही मंत्र्यांच्या दबावापुढे अंमलात आणले जात नाहीत, ही वस्तुस्थिती बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा उघडकीला आलीय. दरम्यान, उडीद घोटाळ्यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना दिलेले आहेत. आता त्यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे. आमचं काम आम्ही केलंय, अशी प्रतिक्रिया कृषी आणि पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पुण्यात दिली.

close