पहिल्या विश्व साहित्य संमेलनाला अमेरिकेत सुरुवात

February 15, 2009 8:41 AM0 commentsViews: 3

15 फेब्रुवारी सॅन होजे अमेरिकेतलं सॅन होजे इथे पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं भारतीय वेळेप्रमाणे शनिवारी रात्री उदघाटन झालं. मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडी पार पडली. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात सर्व साहित्यिकांनी मराठीचा जयजयकार केला. टाळ- मृदूंग आणि तुतारीच्या गजरात ही ग्रंथदिंडी पार पडली. सॅन होजे जवळच्या मिलपिटास या उपनगरातल्या इंडिया कम्युनिटी सेंटरमध्ये संमेलनाचे कार्यक्रम पार पडणार आहेत.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि महामंडळाच्या काही पदाधिका-यांबरोबर 225 सदस्यांचं पथक गुरूवारी दुपारी अमेरिकेत दाखल झालं. अनेक मान्यवर साहित्यिक , कलाकार आणि गायक संगीतकार यांचा या पथकात समावेश आहे. तर इतर 150 साहित्य रसिक स्वखर्चानं अमेरिकेत दाखल झाले आहेत.

close