डोंबिवलीत केमिकल टाकीचा स्फोट, 4 ठार

December 6, 2013 4:11 PM0 commentsViews: 555

domivali blast06 डिसेंबर : डोंबिवलीत दावडीनाका परिसरातील डपिंग ग्राऊंडजवळ एका केमिकल टाकीचा  भीषण स्फोट झालाय. या स्फोटात 4 जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झालेत. हा स्फोट इतका भीषण होता की टाकीचे तुकडे तुकडे झाले. टाकीचे तुकडे आजूबाजूच्या परिसरात पसरले आहे. जखमींना नजीकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

मात्र स्फोटाची तीव्रता लक्षात घेता मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज शुक्रवारी सकाळी बॉयलरला वेल्डिंग करण्याचं काम सुरू या केमिकल टाकीचा स्फोट झाला.

या स्फोटामुळे भंगारा दुकानाला आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. जखमींवर डोंबिवलीतल्या खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

close