रांगोळीतून बाबासाहेबांना आदरांजली

December 6, 2013 4:26 PM0 commentsViews: 464

06 डिसेंबर : गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरणारे सांगलीतले सुप्रसिद्ध रांगोलीकार आदमअली मुजावर यांनीही आपल्या रांगोळीतून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 100 फूट बाय 150 फूट अशी भव्य रांगोळी काढलीय.

 

ही महारांगोळी साकारण्यासाठी त्यांनी 700 किलो रंग आणि 300 किलो ब्राऊन पेपरचा वापर केलाय. या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी असाही त्यांचा प्रयत्न आहे. मिरजच्या सी.आर.सांगलीकर फाऊंडेशननं आदमअलींना या कामासाठी पाठबळ दिलंय. ही रांगोळी जगातली सर्वात मोठी रांगोळी आहे असा दावा आदमअलींनी केलाय.

close