दूध भेसळखोरांना जन्मठेप द्या, कोर्टाची राज्यांना सुचना

December 6, 2013 3:20 PM0 commentsViews: 226

milk 406 डिसेंबर : दूध भेसळीला आळा घालाण्यासाठी सर्वोच्च न्यायासयाने कठोर भूमिका घेतली आहे. भेसळयुक्त दुधाचे उत्पादन किंवा व्यापार करणार्‍यांला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात यावी आणि त्यासाठी राज्य सरकारांनी कायद्यात आवश्यक अशी सुधारणा करावी अशी सुचना सर्वोच्च न्यायालयाने दिली.

सध्या अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार दुधाच्या भेसळीबद्दल 6 महिन्यांची शिक्षा ठोठावली जाते पण ती कमी असल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध विकले जात असल्याच्या जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान हा निर्णय देण्यात आला.

close