आता महिलांशी बोलताना ही भीती वाटते-अब्दुला

December 6, 2013 5:12 PM0 commentsViews: 744

farooq abdullah06 डिसेंबर : केंद्रीय अपारंपारिक उर्जामंत्री फारुख अब्दुल्ला पुन्हा एकदा आपल्या बडबडीमुळे वादात सापडले. आता महिलांशी बोलताना ही मला भीती वाटते, आता परिस्थिती अशी झाली आहे महिलांना पीए म्हणूनही घेता येत नाही काय माहिती उद्या जेलमध्ये जावं लागेल अशी मुक्ताफळं फारुख अब्दुला यांनी उधळली.

सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती ए.के. गांगुली प्रकरणाबद्दल बोलताना अब्दुलांने हे विधान केलं. अब्दुलांच्या या विधानामुळे भाजपच्या नेत्यांनी कडाडून टीका केली. अब्दुला यांच्या विधानामुळे देशात महिलांच्या बाबतीत चुकीचा संदेश जातो अशी टीका भाजपच्या नेत्या स्मृती ईराणी यांनी केली. तर काँग्रेसने बॅकफूटवर येत अब्दुलांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी असं बोलणं चुकीचं आहे, त्यांनी असं बोलू नये अशी टीका काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांनी केली.

मात्र आपल्या विधानामुळे पुन्हा गोंधळ निर्माण झाल्यामुळे काही तासातच अब्दुलांना माफी मागावी लागली. याबद्दल महिला नाही तर समाज दोषी असल्याची टिप्पणी अब्दुला यांनी केली. यावर सगळीकडून गोची झाल्यानंतर अब्दुल्लांनी आता माफी मागितली. यावेळी ते मीडियावरही घसरले. मीडिया विनाकारण अशा प्रकरणात पुरुषाच्या विरोधात वाद घालते असं अब्दुला म्हणाले. विशेष म्हणजे अब्दुलांचा मुलगा आणि जम्मु-काश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दुला यांनी माफी मागावी अशी विनंती केली होती. विशेष म्हणजे फारुख अब्दुला यांनी या अगोदरही गरिबांची थट्टा केली होती. देशात कुठेही 1 रुपयातही जेवता येतं असं विधान अब्दुलांनी केलं होतं. याही प्रकरणी टीकेला सामोरं जावं लागल्यामुळे माफी मागावी लागली होती.

close