मनमोहन सिंग हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार- राहुल

February 15, 2009 10:23 AM0 commentsViews: 3

15 फेब्रुवारी सुरत काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी स्वतःच स्पष्ट केलंय की ते सध्या तरी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाहीत. मनमोहन सिंग हेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, असं राहुल गांधी सुरतमध्ये म्हणाले. राहुल हे लवकरच देशाचं नेतृत्व करतील असं प्रणव मुखजीपासून अर्जुन सिंग यांच्यापर्यंत कित्येक ज्येष्ठ नेत्यांनी बोलून दाखवलं आहे. मनमोहन सिंग यांची तब्येत बिघडल्यावर आता कॉंग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधीच हेच असतील अशी चर्चा होती. पण आता या चर्चेला स्वत: राहुल गांधी यांनीच पूर्णविराम दिला आहे.

close