साखर कारखान्यांना मिळणार 7,200 कोटींचं बिनव्याजी कर्ज

December 6, 2013 7:20 PM0 commentsViews: 616

shugarcane06 डिसेंबर : ऊस दराच्या प्रश्नी कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी केंद्राने पाऊल उचलले आहे. देशभरातल्या साखर कारखान्यांना 7 हजार 200 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय केंद्राच्या विशेष मंत्रिगटाच्या बैठकीत घेण्यात आला.

या कर्जाचा वापर शेतकर्‍यांना उचल देण्यासाठी करण्यात येणार आहे. कारखान्यांनी पाच वर्षांच्या मुदतीत या कर्जाची परतफेड करायची आहे. दरम्यान, पेट्रोलियम पदार्थांमधलं इथेनॉलचं प्रमाण 5 वरून 10 टक्क्यांवर नेण्याची मागणी या मंत्रीगटाने मान्य केलीय.

या बैठकीला कृषीमंत्री शरद पवार,अर्थमंत्री चिदंबरम्, पेट्रोलियम मंत्री मोईली आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के.व्ही थॉमस उपस्थित होते. महाराष्ट्र, कर्नाटक,उत्तरप्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री आणि तमिळनाडूचे संयुक्त सचिव सहभागी हेही या बैठकीत सहभागी झाले होते.

close