अश्रू आणि कृतज्ञता

December 6, 2013 9:05 PM0 commentsViews: 342

06 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेतल्या जनतेच्या लोकांच्या आयुष्यात नेल्सन मंडेलांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर हजारोंच्या संख्येने लोक त्यांच्या घराबाहेर गोळा झालेत. त्यांना एकीकडे अश्रू आवरत नाहीत, तर दुसरीकडे ते त्यांच्या लाडक्या मडिबांचं आयुष्य सेलिब्रेट करत आहेत. मंडेला दीर्घकाळापासून आजारी होते. ही दुःखद बातमी कधीही येईल हेही त्यांना माहित होतं. आता मडिबा गेल्यानंतर त्यांची कृतज्ञता व्यक्त करणं लोकांना जास्त महत्त्वाचं वाटतंय.

close